Web Webdunia.com anil-2001
Webdunia Portal |  Greetings |  Classifieds |  E-mail |  Take A Tour |  Font Download |  Feedback
X
Welcome, Guest  [ Portal's List |  Create Portal |  Sign In ]
 लोड होत आहे...

• रामरक्षा

श्रद्धा

मी नुकतीच वकीलीच्या व्यवसायाला सुरुवात केली होती. माझ्या मोठ्या भावाला मी चार्टरड अकाउंटंट होऊन इन्कम टॅक्सची प्रॅक्टीस करावी असं वाटत होतं, पण मला ते जमलं नाहीं. वकीलीच्या प्रॅक्टीसमध्ये इन्कम टॅक्सची सुद्धा प्रॅक्टीस करता येते असा तोडगा निघाला. माझ्या भावाचा बिल्डिंग कंस्ट्रक्शनचा बिझिनेस होता. त्याने मला आपल्या ऑफिसांत मला एक टेबल स्पेस दिलं. मी तिथे बसून माझी वकीलीची आणि टॅक्सची प्रॅक्टिस करूं लागलो. एकदा माझ्या भावाला इंकम टॅक्सच्या असेसमेंटची नोटीस आली. मी इन्कम टॅक्स ऑफिसांत जाऊन ती केस अ‍ॅटेंड करूं लागलो. आय. टी.ओ. ला माझं म्हणणं पटेना. त्याने माझ्या भावाला बोलवून त्याची जबानी घ्यायची असं ठरवलं. आम्ही दोघे त्याप्रमाणे त्या आय्. टी.ओ. कडे गेलो. तो जिद्दीला पेटला होता. काहीं केल्या ऐकायला तयार नव्हता. 39 ह. रु. टॅक्स व त्यावर पीनल इंटरेस्ट वगैरे बोलूं लागला. त्याकाळीं 39 ह. रु. ही रक्कम फार मोठी होती. माझा भाऊ हताश झाला. इतकी मोठी रक्कम त्याला फार जड जात होती. त्याने आत्महत्येची भाषा सुरुं केली. त्यावर आय्. टी.ओ.ने परमेश्वरावर श्रद्धा ठेवायला सुचवलं. 'परीथिती इतकी वाईट आहे काय, की परमेश्वराचं स्मरण करावं?' माझ्या भावाने प्रश्न केला. 'आत्मह्त्येच्या विचारापेक्षा परमेश्वराचं स्मरण नेहेमीच चांगलं!' आय्. टी. ओ. ने सुचवलं. त्यानंतर मला आमच्या आईने माझा भाऊ नियमितपणे रामरक्षा वाचत असल्याचं सांगितलं. त्यानंतर थोड्याच दिवसांनी त्या आई. टी. ओ.ला प्रमोशनसह ट्रांसफर मिळाली आणी त्याच्या जागी नव्याने आलेल्या आय.टी. ओ. ने अ‍ॅ‍सेसमेंत ऑर्डर पास करून देऊन 12 ह.रु. रिफंड such. देववला !!ही त्या रामाची कृपाच‍!!
अनिल शर्मा.
श्रेणी: Blog
 शीर्ष रेट केलेले लेख
 अलिकडील प्रविष्ट्‍या